...आणि प्राचार्य डॉ. रोंगे सरांनी केला बसने प्रवास !



श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट मध्ये नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ साजरा !
पंढरपूरः बुधवारचा दिवस, खरे तर साप्ताहिक सुट्टीचा ! पण त्यातून राष्ट्रपिता गांधी जयंती मग काय? स्वेरीमध्ये गांधी जयंतीच्या निमित्ताने विचारांची मेजवानीच असते ना ! राष्ट्रपिता गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री या महापुरुषांची जयंती असल्यामुळे शाळा महाविद्यालय वगळता सर्व शासकीय कार्यालयांना सुटी असल्यामुळे रस्त्यांवर वाहनांची वाहतूक जवळ जवळ नव्हतीच ! पण स्वेरी परिवारातील प्राध्यापक, शिक्षककेतर कर्मचारी व विद्यार्थी आपल्या नेहमीच्या वाहनावर स्वार झाल्याचे दिसत नव्हते. त्यामुळे स्वेरीने गांधी जयंतीची सुट्टी जाहीर केली की काय ?, ‘आज स्वेरी महापुरुषांची जयंती साजरी करणार नाही की काय?’ असे प्रश्न अनेकांना पडले. परंतु स्वेरीची कॉलेज बस वगळता स्वेरीची अन्य कोणतीही खाजगी वाहने रस्त्यावर धावत नव्हती. डॉ. रोंगे सर मात्र आपल्या निवासस्थानापासून (गेंड वस्ती ,कराड रोडपंढरपूर) चालतच निघाले. अनेकांना त्यांचे वाहन बंद पडले की कायअसेही वाटले. दरम्यान अनेक वाहन चालकांनी चला सरतुम्हाला कॉलेजला सोडतो.’ असे म्हणत रोंगे सरांना गाडीवर बसण्याचा आग्रह करत होते. पण रोंगे सरांनी आज ‘ नो प्रायव्हेट व्हेईकल डे साजरा करत असल्याचे सांगून आज खाजगी वाहनांचा वापर करायचा नाही’ असे सांगितले. नियोजित वेळेनुसार कॉलेज बस पंढरपुरातील ठाकरे चौकात आली. बसचे ड्रायव्हर सागर कदम हे देखील डॉ. रोंगे सरांना बस थांब्यावर पाहून अचंबित झाले. डॉ. रोंगे सरांना बसमध्ये चढताना पाहून विद्यार्थीनींना देखील आश्चर्य वाटले. स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ रोंगे सरांच्या बसमधील आगमनाने मात्र नियमीतच्या किलबिलाटा ऐवजी आदरयुक्त शांतता जाणवत होती. बसमध्ये देखील डॉ. रोंगे सरांनी विद्यार्थ्याबरोबर संवाद साधत वाहतुकीतील अडचणी विचारल्या. नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ च्या निमित्ताने डॉ. रोंगे सरांसह स्वेरीतील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या वाहनाना सुट्टी दिली.
         त्याचे झाले असे कीश्री विठ्ठल एज्युकेशन अॅंड रिसर्च इन्स्टिटयूट पंढरपूर अंतर्गत असणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेसा (मेकॅनिकल इंजिनिअररिंग स्टुडंट असोशिएशन) तर्फे आयोजिलेल्या अभियांत्रिकी व फार्मसी (पदविकापदवीपदव्युत्तर पदवी) व एम.बी.ए. विभागामधील सर्वच सदस्यांनी नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ च्या निमित्ताने आपल्या खाजगी गाड्यांना विश्रांती देवून काहीजण बसटमटमरिक्षाने तर काही प्राध्यापक चालत कॉलेज गाठत होते. नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ च्या निमित्ताने संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे म्हणाले इंधन बचाव व पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या हेतूने आज नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ अभियानाचे आयोजन केले होते. यामध्ये संस्थेअंतर्गत असणाऱ्या सर्वच सदस्यांनी या एकदिवसीय नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ च्या अभियानात सहभाग नोंदविला. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्याबरोबर काही प्राध्यापक देखील बसमध्ये बसले. तसेच स्वेरीचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, डिप्लोमाचे प्राचार्य प्रा. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजीत गिड्डे, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. पी.एस. कचरे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, विभागप्रमुख डॉ. सचिन  सोनवणे, ग्रंथपाल प्रा. एस. एम. बागल, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर यांच्यासह काही प्राध्यापक, विद्यार्थी हे टमटम व स्कूल बसमधून आले. ट्रेनिंग अॅंड प्लेसमेंटचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ यांनी चक्क सायकलवरून कॉलेज गाठले. शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार,एम.बी.ए.च्या प्रा. मिनल भोरे, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्रा. अवधूत भिसे, मधुकर मोरे, सुभाष काळे हे चक्क चालत कॉलेजला आले. विशेष म्हणजे बसमधून उतरताना सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांच्यासह इतर प्राध्यापकांनी खरेदी केलेले बसचे कुपन्स वाहक कदम यांच्याकडे दिले. दररोज खचाखच भरलेल्या वाहन तळाची जागा आज रिकामी दिसत होती. काही जागा सायकलींनी घेतली होती. त्यामुळे परिसरात सायकलचा ‘ट्रिंग ट्रिंग’ असा एकच आवाज ऐकू येत होता. स्वेरीच्या या नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ चे पढरपूरकरांनी उत्साहाने स्वागत केले.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________

_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments