VIDEO
2009 सालापासून या तालुक्यात जातीयवाद करणारे एकमेव आमदार म्हणजे भारत भालके आहेत. मराठा समाजातील कोणत्याही आंदोलनाला पाठींबा दिला नाही. कोणत्याही अडचणी सोडवल्या नाहीत. याउलट मराठा समाजातील चळवळीत काम करणा-यांचे खच्चीकरण करून त्यांना संपवण्याचं पाप त्यांच्याकडून झाले असा सणसणाटी आरोप विजय-प्रताप मंचचे दिपक वाडदेकर यांनी आमदार भारत भालके यांच्यावर केला आहे. ते पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारार्थ इसबावी येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. भारत भालके यांना मराठा समाजातील बंधु-भगिणींनी मतदान करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.पंढरपूर - 2009 सालापासून या तालुक्यात जातीवाद करणारा एकमेव आमदार म्हणजे भारत भालके असल्याचा घाणाघाती आरोप विजय-प्रताप मंचचे दिपक वाडदेकर यांनी केले. ते पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारार्थ इसबावी येथील आयोजित सभेत ते बोलत होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
मोहिते-परिचारक घराण्यात भांडण लावली व मागील दहा वर्षांत आपली पोळी भाजून घेत आहेत. परिचारक यांनी आपल्या प्रत्येक संस्थेवर मराठा समाजाला नेतृत्त्व करण्याची संधी दिली आहे त्यामुळे जातीवाद करणारे परिचारक नसून आ.भालके आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले. मराठा समाजातील कोणत्याही आंदोलनाला पाठींबा दिला नाही. कोणत्याही अडचणी सोडवल्या नाहीत. याउलट मराठा समाजातील चळवळीत काम करणार्याचे खच्चीकरण करून त्यांना संपण्याच काम पाप त्यांच्याकडून झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान विरोधकांनी खालच्या पातळीवर प्रचार करु नका असा रग्गड सल्लाही त्यांनी दिला. 70 हजार मराठा समाजाचा ठेका काय भालकेंना दिला नाही. तर मराठा समाजातील नागरिकांनी विचार करून विकास करणार्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. परिचारक कुटुंबांनी कधीही जातीवाद केला नाही. येत्या काळात विजयदादा व सुधाकर मालक आज पुन्हा एकत्र आले असून जिल्ह्यातील विविध विकास कामे करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढ्यातून सुधाकर परिचारक यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
विधानपरिदषदेचे आ.प्रशांत परिचारक यांनी इसबावी व शहरात केलेल्या विकास कामांची अभ्यासपूर्ण माहिती दीली. व मोठ्या मालकांना पुन्हा काम करण्याची संधी देण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
यावेळी अनिल अभंगराव, शिरीष कटेकर, विकी अभंगराव, अदिनाथ गाडे सर, रवी मुळे, संजय वाईकर, शकुंतला नडगीरे, अशोक डोळ, साईनाथ अभंगराव यांनी आपले भाषणे केली. व्यासपीठावर नगराध्यक्षा साधना भोसले, माजी उपनगराध्यक्ष विशाल मलपे, नगरसेविका भाग्यश्री शिंदे, सचिन शिंदे, माजी नगरसेवक गणेश अधटराव, बादल ठाकूर, सुखदेव मलपे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments