पंढरपूर सिंहगड मध्ये "अविष्कार" या स्पर्धेचे आयोजन
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात अविष्कार या प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर यांच्या हस्ते फीत कापुन करण्यात आले.
अविष्कार या स्पर्धेविषयी डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना एल. सी. डी. स्क्रीन द्वारे माहिती दिली. या वेळी परिवेक्षक डाॅ. अतुल सागडे यांचा प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रा. अमोल जगदाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रकल्प विषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
यावेळी अविष्कार मध्ये राहुल चव्हाण, विनायक पवार, प्रशांत पवार, रविराज चव्हाण, सचिन हाके या विद्यार्थ्यांनी एकञ येऊन प्लॅस्टिक वीट तयार केली असुन ही वीट टाकाऊ साहित्यापासून आणि वाळूचा उपयोग केला आहे. तयार केलेल्या विटचे वजन अंदाजे अडीच किलो च्या आसपास भरते. अलीकडच्या काळात पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकच्या कॅरीबॅग, व इतर अन्य प्लास्टिकचे साहित्य इतरत्र न फेकता त्या प्लास्टिकचा उपयोग जर अशा विटा बनवण्यासाठी केला, तर त्या प्लास्टिकचा ही खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होईल. तसेच ज्योती ढोबळे, प्रणाली चव्हाण, तृप्ती पुजारी, भाग्यश्री बागले या विद्यार्थिनीनी प्लॅस्टिक बॅग पासून होणारे पर्यावरणाचे नुकसान लक्षात घेता त्या फेकून दिलेल्या प्लास्टिकचा उपयोग हा प्लॅस्टिक पेव्हर ब्लाॅग तयार करण्यासाठी प्लास्टिकचा उपयोग केला आहे. वाया जाणाऱ्या प्लास्टिक चा उपयोग पेवर ब्लॉक तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होऊ शकतो असा दावा विद्यार्थिनींनी केला आहे. पंढरपूर सिंहगड च्या विद्यार्थ्यांची कल्पना ही कौतुकास्पद असून या प्रकल्पाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. हा प्रकल्प तयार करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. संगमनाथ उप्पीन यांनी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अविष्कार या स्पर्धेत महाविद्यालयातील ६६ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला होता. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपञ तसेच विजयी स्पर्धेकांना सन्मान चिन्ह, बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. अविष्कार मध्ये महाविद्यालयातील २६ हून अधिक प्रकल्प सादर करण्यात आले होते. शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्रा. अविनाश हराळे यांनी काम पाहिले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अमोल जगदाळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________








0 Comments