आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त पंढरीत 14 फेब्रुवारी रोजी सामुदायीक विवाह सोहळ्याचं आयोजन

Pandharpur Live - 

पंढरपूर (प्रतिनिधी):- आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त दि. 14 फेब्रुवारी 2020 रोजी पंढरीत कोळी महादेव जमातीच्या सामुदायीक विवाह सोहळ्याचं आयोजन केले असल्याची माहिती महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

या वर्षी महाराष्ट्रावर आस्मानी संकट कोसळले. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात होत्याचे नव्हते झाले. शेतकरी बांधवांसह सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर या परिस्थितीमुळे प्रतिकुल परिणाम झाला. यामुळे समाजातील वधु-वरांचे विवाह धुमधडाक्यात साजरे करणे अशक्य बनले आहे. आई-वडीलांना आपल्या उपवर मुलांच्या विवाहाची चिंता लागुन राहिलेली असते. याचा सारासार विचार करुन महर्षी वाल्मिकी संघाने या सामाजिक जबाबदारीचं भान राखुन आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीचं औचित्य साधुन सामुदायीक विवाह सोहळ्यामध्ये समाजातील उपवर वधु-वरांना रेशीमगाठीत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.  शुक्रवार दि. 14 फेब्रुवारी 2020 रोजी गोरज मुहूर्तावर सायंकाळी वाल्मिकी भवन (नाट्यगृह), आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे व्यायामशाळेजवळ, क्रांती चौक, कोळी गल्ली, पंढरपूर येथे हा सामुदायीक विवाह सोहळा संपन्न होईल. 
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________

या विवाह सोहळ्यासाठीची नावे नोंदणी चालु असुन समाजातील इच्छुकांनी वाल्मिकी भवन (नाट्यगृह), आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे व्यायामशाळेजवळ, क्रांती चौक, कोळी गल्ली, पंढरपूर येथे वधु-वरांच्या नावांची नोंदणी करावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

जयंतीनिमित्तच्या इतर अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामुदायीक विवाह सोहळ्याच्या रुपाने हे विधायक मंगल कार्य घडवुन आणताना आम्हास नितांत आनंद होत आहे. आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी व नव वधु-वरांना आशिर्वाद देण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. अशी विनंती महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली आहे. 

_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments