देगावमध्ये पंढरपूर- तिर्‍हे रस्ता दुरूस्तीच्या मागणीसाठी ’बळीराजा शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन’




Pandharpur Live - पंढरपूर- ति-हे  मार्ग दुरूस्त करण्याच्या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने देगाव येथे या मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  खराब रस्त्यावरील खड्डे बुजवून चागंला रस्ता तयार करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी  केली.  शेतकरी नेते माऊली हळणवर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. 
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
या आंदोलनात विविध गावचे सरपंच, शांतु बप्पा रणदिवे, काका पाटील, संतोष घाडगे, अमोल पाटील,  समाधान घाडगे, अमोल चव्हाण, संतोष बोबडे, आदींसह देगाव, सुस्ते तारापुर, अजनसोंड, बिटरगाव आदी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना माऊली हळणवर यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  करकंब उपविभागाने कुठलेही काम केलेले नाही. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली मलीदा लाटण्याचे काम मात्र केले. मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात अनेकांना आपले जीव गमवावे लागले. लवकरात लवकर हे काम न झाल्यास या पेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा हळनवर यांनी दिला.

 यावेळी निवेदन स्विकारण्यासाठी करकंब विभागाचे शाखा अभियंता पाटील हजर राहिले होते.  पोलिस उपनिरीक्षक खरात, ढवळे, फुगारे, माळी आदींसह पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.


_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments