माणसाच्या आरोग्याला रासायनिकतेचा घातक विळखा : दुधाळ

Pandharpur Live - सध्या माणसाला अनेक आजारांंचा सामना करावा लागत असून त्यामुळे माणसाचे आरोग्य धोक्यात आले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे शेती अथवा इतरत्र वापरण्यात येणारे रासायनिक पदार्थ हे असल्याने माणसाच्या आरोग्याला रासायनिकतेचा घातक विळखा पडला असल्याचे प्रतिपादन सहायक शास्त्रज्ञ टाटा हॉस्पिटल व मार्गदर्शक डॉ. नवनाथ दुधाळ यांनी केले. 

पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील श्री सद्गुरु कृपा नैसर्गिक हॉटेल, गोपाळपूर नैसर्गिक चिकित्सालय यांच्या वतीने आयोजित केलेल्या पंचगव्य व प्राकृतिक चिकित्सा शिबीरात बोलत होते. यावेळी श्री सद्गुरु कृपा पंचगव्य व निसर्गोपचार केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. 
यावेळी रामहरी कदम, रायचूरकर, डॉ राजेश इतापे,पांडुरंगचे संचालक परमेश्वर गणगे , नागनाथ कदम, तानाजी कदम, गहिनीनाथ रितोंड, माजी कृषी अधिकारी मधुकर गुंजाळ, बाळासाहेब भोसले, नागनाथ माळी, उपस्थित होते. 
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________

पुढे बोलताना दुधाळ म्हणाले की, पुर्वी आपण जे नैसर्गिक अन्न अथवा वस्तू वापरत होतो. त्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले असून त्यामुळे आजारांचे थैमान वाढत आहे. परंतु यावर मात करण्यासाठी आपण सेंद्रिय व नैसर्गिक पदार्थ निर्मिती व वापर ही चळवळ वाढवली पाहिजे. यासाठी बहुसंख्य गुणी असणारी देशी गाय वाचली पाहिजे,निसर्ग संवर्धन झाले पाहिजे, आयुर्वेदिक औषधोपचार घेणे यासह अनेक क्षेत्रात काम करावे लागणार आहे. त्याचबरोबर पाश्चात्य वस्तूंचा वापर करण्यापेक्षा स्वदेशी वस्तूंचा वापर करून स्वदेशी पैसा स्वदेशीच राहून अर्थव्यवस्था बळकटीचा प्रयत्न केला जावा. तापमानवाढीचे मोठे संकट उभे राहिले असून यामुळे निसर्गाच्या प्रकियेत वाईट बदल होऊन त्याचा आरोग्यवर घातक परिणाम होताना दिसत आहे. यामुळे वृक्ष संवर्धन हाच एकमेव उपाय आहे. एकुणच आरोग्यासाठी घातक असलेला रासायनिकतेचा  विळखा मोडण्यासाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय निर्मिती, संवर्धन व वापर ही चळवळ वाढवली पाहिजे. 

_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments