रायगडावर सापडलेला शिवरायांचा अनमोल सुवर्ण होन गायब


Pandharpur Live : 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडावर काही दिवसांपूर्वी स्थानिक व्यक्तीला सापडलेला 'सुवर्ण होन' गायब झाला आहे. हा होन छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातला अतिशय महत्त्वाचा घटक आणि राष्ट्रीय संपत्ती आहे; त्यामुळे हा होन ज्यांनी गायब केला आहे, तो त्यांनी तातडीने पुरातत्व खात्याकडे जमा करावा, अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केली आहे.

ते म्हणाले, रायगडावर अनेक व्यक्तींना 'तांब्याच्या शिवराई' मिळाल्या आहेत. पुरातत्व खात्याने केलेल्या उत्खननात तर अनेक मौल्यवान गोष्टी मिळाल्या होत्या, अजूनही मिळत आहेत; मात्र आजवर शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी रायगडच्याच टांकसाळीमध्ये पडलेली 'सुवर्ण होन' अजूनपर्यंत मिळाले नव्हते. हे होन इतके दुर्मीळ आहेत, की आजही १0 ते १२ च होन उपलब्ध झाले आहेत. हा होन काही दिवसांपूर्वी एका स्थानिक मुलीला मिळाला आहे.

शिवप्रेमींनी हा सुवर्ण होन पाहिला, हाताळाला त्याची छायाचित्रेही काढली. हा होन राष्ट्रीय ठेवा असल्याने तो पुरातत्व खात्याकडे जमा होणे गरजेचे होते; मात्र असे झाले नाही. त्या मुलीने हा होन कोणाला दिला की स्वत:कडेच ठेवला आहे? याचा शोध घेतला पाहिजे.

होन रायगडावरच शिवप्रेमींना पाहायला मिळाला पाहिजे, याबाबत खासदार संभाजीराजे यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनीही हा ठेवा शासन जमा करावा, अशा सूचना केल्या आहेत. शिवाय हा होन ज्या व्यक्तीला मिळाला, त्या व्यक्तीला भरघोस बक्षीसही देण्याचेही जाहीर केले आहे. तरी संबंधितांनी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन इंद्रजित सावंत यांनी केले आहे.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments