पंढरपूर- आ. प्रणितीताई शिंदे यांना मंत्रीपद दिले नसल्याने कार्यकर्त्याची नाराजी... सोनिया गांधींना रक्ताने लिहीलेलं पत्र पाठवलं!


Pandharpur Live : आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद न भेटल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील काँग्रेस च्या पदाधिका-याने काँग्रेस च्या नेत्या सोनिया गांधी यांच्या नावे स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.  सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस (आय) चे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी  हे पत्र लिहिलंय. यासंदर्भात त्यांनी खालीलप्रमाणे आपल्या भावनांना वाट करून दिलीय. 

    आदरणीय प्रणितीताई शिंदे यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिलेच्या निषेधार्थ आज मी माझ्या रक्ताने पत्र लिहून आदरणीय सोनियाजी गांधी यांच्याकडे पाठवत आहे.

गेल्या अनेक वर्षापासून सुशीलकुमार शिंदे साहेब व कुटुंबीयांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून पडेल ती जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे पार पाडली आहे .आज मी माझ्या रक्ताने हे पत्र मुद्दाम आपणास लिहीत आहे. कारण, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये प्रणिती ताई शिंदे यांना संधी दिली नाही. तसेच, सुशीलकुमार शिंदे साहेबांना राज्यसभेवर ही संधी दिली नाही.

साहेबांनी व ताईंनी स्वतःच्या रक्ताचे पाणी करुन पक्षाशी इमान राखले आहे जिल्ह्यासोबतच त्यांनी राज्यामध्ये पक्ष वाढीचे काम केले आहे. देशातील दलित चेहरा म्हणून दलित जनता मोठ्या विश्वासाने साहेबांकडे बघत आहे.

अशी अनेक पत्र मी व राज्यातील असंख्य कार्यकर्ते लिहू शकतात. कारण, शिंदे कुटुंबीय कार्यकर्त्यांना स्वतःच्या नात्याप्रमाणे जपतात, आमच्या सुखदुःखात सहभागी होतात, याच प्रेमाचा आदर करून शिंदे साहेबांना राज्यसभेवर व प्रणिती ताई शिंदे यांना राज्य सरकारमध्ये मोठी जबाबदारी देऊन लाखो कार्यकर्त्याला बळ द्यावे ही नम्रतेची विनंती.

आपला विश्वासू
  नितीन नागणे
जिल्हाध्यक्ष सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस (आय)





_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments