नाथाभाऊंची गर्जना.. पाडापाडी करणाऱ्या भाजपातील नेत्यांची नावे पुराव्यानिशी उघड करू का?- एकनाथ खडसे


Pandharpur Live : गिरीश महाजन यांनी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. पाडापाडी करणाऱ्या पक्षातील नेत्यांची नावानिशी यादी मी वरिष्ठांकडे जमा केली आहे. पक्षाध्यक्षांनी परवानगी दिली तर मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ती सर्वांना सांगेन, असं उत्तर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिलं.

भाजपमध्ये पक्षांतर्गत वादाला सुरवात झाली आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष हा OBC नेत्यांची गळचेपी करत असल्याचा आरोप करत रोहिणी खडसे यांच्या पराभवाचे खापर पक्षातील नेत्यांवरचं फोडले आहे. यावरून भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना पुराव्यानिशी आरोप करा, असे थेट आव्हान दिले.

ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांना पाडणाऱ्यांची नावे एकनाथ खडसे यांनी पक्षश्रेष्ठींकडे दिल्याचे ते सांगत आहेत. त्यांनी ती नावे गुप्त न ठेवता पुराव्यानिशी थेट जाहीर करावीत. पक्षात कोणीही कोणाला पाडत नाही. त्यांना अपयश आले, याचे आम्हालाही वाईट वाटते. मुक्ताईनगर मतदार संघातून खडसे हे यापूर्वीही अँड. रवींद्र पाटील यांच्याविरोधात १,२00 मतांच्या फरकाने आणि मागील निवडणुकीत प्रचंड मोदी लाट असतानाही केवळ ८,५00 मतांनी निवडून आले आहेत.यावेळी खडसे यांना तिकिट नव्हते. त्यामुळे फरक पडला, असे महाजन म्हणाले.

दरम्यान, भाजप पक्षात सर्वाधिक OBC आहेत. आणि भाजपमध्ये सर्वांना समान संधी दिली जाते. ओबीसी नेत्यांना भाजपाने कधीही डावलले नाही. ओबीसी नेत्यांना मानाचे आणि सर्वाधिक स्थान दिले आहे.मंत्रिमंडळाचा विषय घेतला, तर ओबीसी नेत्यांचीच सर्वाधिक संख्या होती. पंकजा मुंडें, मी स्वत: ओबीसी, बावनकुळे ओबीसी, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे आम्हा ओबीसींचीच संख्या जास्त होती, असेही महाजन म्हणाले.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments