Pandharpur Live :
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात अभियांत्रिकी चे शिक्षण घेतलेल्या कुमारी दिव्या कुलकर्णी हिला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून नुकतेच सुवर्णपदक मिळाले असुन सुवर्णपदक प्राप्त कुमारी दिव्या कुलकर्णी हिचा महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना कुमारी दिव्या कुलकर्णी म्हणाल्या, सिंहगड महाविद्यालयातील शिक्षण पद्धती अतिशय सुंदर आहे. महाविद्यालयातील शिक्षक वैयक्तिक प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देतात. टीचर्स गार्डीयन ही पद्धत सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय अतिशय उत्तम पद्धत आहे. यामुळे विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. त्यामुळे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात हा अग्रेसर राहतो. याचा फायदा मलाही खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे.
महाविद्यालयातील दर्जेदार शिक्षण पद्धतीमुळे मी आज नामांकित कंपनीत नोकरी मिळवू शकले. शिवाय उत्कृष्ट शिक्षणामुळे मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयातुन प्रथम क्रमांक मिळवू शकले. त्यामुळे मला विद्यापीठाकडून सुवर्णपदक मिळाले. या यशात माझ्या आई-वडिलांचा व सिंहगड महाविद्यालयाचा खूप मोलाचा वाटा असल्याचे मत दिव्य कुलकर्णी यांनी सत्काराला उत्तर देताना मत व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डॉ. चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे, डॉ. शाम कुलकर्णी, डॉ. स्वानंद कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यादरम्यान प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डॉ. श्याम कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करून दिव्या कुलकर्णी हिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. ऋषिकेश कुलकर्णी यांनी केले.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

0 Comments