स्वेरीज् बी.फार्मसीचे इन्स्टा व्हिजन लॅबोरेटरी अँड सर्विसेस बरोबर सामंजस्य करार स्थापित



Pandharpur Live : 
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटपंढरपूर संचलित कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्मसी) आणि औषध निर्माणशास्त्र क्षेत्राशी निगडीत असलेल्या इन्स्टा व्हिजन लॅबोरेटरी अँड सर्विसेससातारा यांच्यात नुकताच सामंजस्य करार स्थापित करण्यात आल्याची माहीती स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
        या सामंजस्य करारामुळे बी. फार्मसीमधील विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग यांना संशोधन प्रकल्पासाठी मदत होणार आहे. हा सामंजस्य करार २०१९-२० ते २०२३-२४ या पाच वर्षापर्यंत असून करारावर इन्स्टा व्हिजन लॅबोरेटरी अँड सर्विसेसचे संचालक अजित ईकाल यांची स्वाक्षरी आहे. या करारासाठी स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.अमित गंगवालडॉ.मिथुन मणियार, प्रा.आर. एस. नाईकनवरेप्रा. प्रज्ञा साळुंखे, प्रा.प्रदीप जाधव, प्रा. व्ही.व्ही.मोरेप्रा.ज्योती मोरे यांच्यासह इतर प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. सामंजस्य करार स्थापन केल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.सी.बी. नाडगौडाउपाध्यक्ष आर. बी. रिसवडकर, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालकांनी बी. फार्मसीचे प्राचार्य व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments