पंढरपूर दि-18- पंढरपूर शहरात रविवार दि. 19 जानेवारी 2020 रोजी पल्स पोलीओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेसाठी शहरात 48 बुथ लावण्यात येणार असून, शहरातील शुन्य ते पाच वर्षे वयोगटातील 9 हजार 900 बालकांना पोलीओ डोस पाजण्यात येणार आहे. यासाठी 170 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे यांनी दिली.
शहरात शंभर टक्के पल्स पोलीओ मोहिम यशस्वी करण्यासाठी शहरातील सर्व नगरपालीका शाळा व दवाखाने, अंगणवाडी व खासगी शाळा, शासकीय कार्यालये, बाल व महिला रुग्णालये, एस.टी.स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, श्री. विठ्ठल –रुक्मिणी मंदीर तसेच कैकाडी महाराज मठ या ठिकाणी लसीकरण बुथची व्यवस्था करण्यात आली आहे. या बुथवर 170 कर्मचारी कार्यरत राहणार असून, 16 वैद्यकीय अधिकारी, 16 सुपरवायझर यांच्या मार्फत नियत्रंण केले जाणार आहे. तसेच लसीकरण मोहिमेसाठी तीन फिरते पथकही तयार करयात आले असल्याचेही वैद्यकीय अधिक्षिका डॉ. ढवळे यांनी सांगितले .
लसीकरण मोहिमेनंतर म्हणजेच 20 ते 24 जानेवारी या कालावधीत पुढील पाच दिवस घरोघरी लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना ही लस दिली जाणार आहे. यासाठी 40 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुन्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना लस दिली जाणार असून पालकांनी आपल्या बालकांना लसीकरण केंद्रावर घेवून जावे तसेच लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन वैद्यकीय अधिक्षिका डॉ. ढवळे यांनी केले आहे.


0 Comments