शेतकर्‍यांसाठी दिलासादायक...आता सरकारी कामासाठी सातबारा घेऊन जाण्याची गरज नाही!


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य शासनानं लाखो शेतकऱ्यांचे डिजिटल सातबारा उतारे संगणकावर उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामुळे आता कोणत्याही सरकारी कामासाठी शेतकऱ्यांना सातबारा घेऊन जाण्याची गरज नाही.

शेतकऱ्यांंना सातबारा मिळवण्यासाठी मोठी पळापळ करावी लागते. मात्र, आता शेतकऱ्यांच्या मागे असणारी सातबाऱ्याची कटकट मिटण्याची शक्यता आहे. कारण शेतकऱ्यांचे सातबारे संगणावर अपलोड करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांना आता कोणत्याही कार्यालयात काम असल्यास संबंधित कार्यलयाकडे शेतकऱ्यांचे डिजिटल सातबारा उतारे संगणकावर उपलब्ध असणार आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांना सातबाऱ्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. याबाबतचे परिपत्रक सरकार लवकरच काढणार आहे.
दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा आणि खाते उतारा ऑनलाईनचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरु होतं. सरकारचं हे पत्रक काढल्यास शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेत किंवा सरकारी कार्यालयात सातबारा घेऊन फिरण्याची गरज नाही.

Post a Comment

0 Comments