Pandharpur Live-
पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील ग्रामपंचायतीमध्ये 18 ते 20 लाखांचा आर्थिक घोटाळा झाला असल्याचा खळबळजनक आरोप करत याची चौकशी करण्याची मागणी अर्जदार दत्तात्रय सुखदेव पाटील, लक्ष्मण जगन्नाथ नागटिळक (दोघे रा. कौठाळी, ता.पंढरपूर) या दोन
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जलशुध्दीकरण केंद्रामध्ये आर्थिक गैरव्यवहार आहे, जलशुध्दीकरण केंद्राद्वारे ग्रामस्थाना पुरवल्या जाणार्या पाण्याद्वारे मिळणारी रक्कम ही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नामध्ये (ग्रामनिधी) जमा केली नसल्याचा ठपका या निवेदनात सरपंचांवर ठेवला आहे. तसेच ग्रामपंचायत हद्दीतील दगड, धोंडे, झाडे, झुडपे, माती वगैरेच्या विक्रीतून आलेली रक्कमही ग्रामनिधीमध्ये जमा केलेली नाही. हे सर्व ग्रामसेवकांनीही मान्य केले आहे. व यासंदर्भातील व्हिडीओ चित्रीकरणही आपणाकडे असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
वरील सर्व आर्थिक घोटाळा हा एकुण 18 ते 20 लाख रुपयांचा असुन सदर गैरव्यवहारामुळे ग्रामपंचायतीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. परिणामस्वरुप ग्रामस्थांना ग्रामपंचायतीकडून आवश्यक त्या मुलभुत सुविधा मिळत नाहीत. सदर गैरव्यवहाराची वरिष्ठ अधिकार्यांमार्फत चौकशी करावी व संबंधितावर कडक कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनाची प्रत ग्रामविकास राज्यमंत्री, जिल्हाधिकारी सोलापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सोलापूर व गटविकास अधिकारी पंढरपूर यांना देण्यात आली आहे.
1 Comments
Thanks for the blog loaded with so many information
ReplyDelete