सोलापूरात आढळला दुुसरा कोरोना रुग्ण... खाजगी रुग्णालयातील नर्स कोरोना बाधीत

Pandharpur Live- सोलापुरात कोरोनामुळे एका दुकानदाराचा मृत्यू झाला होता. यानंतर या दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या 91 जणांचे स्वॅब तपासण्यात आले. यातील 67 जणांचे रिपोर्ट हाती आले आहेत. यापैकी 66 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तर खाजगी रुग्णालयातील एका नर्सला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. अद्याप चोवीस जणांचे अहवाल हाती येणे बाकी आहे.

अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रसिद्ध माध्यमांना बोलताना दिली.

उर्वरित चाचणी अहवाल सायंकाळपर्यंत येतील असेही जिल्हाधिकारी म्हणाले . लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये . प्रशासनाला सहकार्य करावं . तपासणी करण्यास येणार्‍या कर्मचार्‍यांना माहिती द्यावी असेही आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केलं आहे .