हे गाव भारतातील गुजरात राज्यातील कच्छ येथे वसलेलं आहे. या गावाबद्दल अनेक अनोख्या गोष्टी आणि किस्से लोकांना सांगितलं जातात. या गावाबाबत एक गोष्ट अशी आहे, जी पहिल्यांदा ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. हे गाव जगातील सर्वात श्रीमंत गावांपैकी एक मानलं जातं (Richest Village In World)
पडणार भारी, लिहिणाऱ्याला शोधतायेत पोलीस; नेमकं काय आहे प्रकरण पाहा मिळालेल्या माहितीनुसार, माधापरमध्ये सुमारे 17 बँका आहेत आणि येथील प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 15 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा आहे.
यासोबतच इथे शाळा-कॉलेज, हॉस्पिटलचीही चांगली सोय आहे. एवढंच नाही तर या गावात तलाव आणि उद्यानंही आहेत. हे गाव खूप श्रीमंत असण्यामागं एक खास कारण आहे. येथील बहुतांश लोक परदेशात राहतात.
यासोबतच इथे शाळा-कॉलेज, हॉस्पिटलचीही चांगली सोय आहे. एवढंच नाही तर या गावात तलाव आणि उद्यानंही आहेत. हे गाव खूप श्रीमंत असण्यामागं एक खास कारण आहे. येथील बहुतांश लोक परदेशात राहतात.
त्याचबरोबर अनेक वर्षे परदेशात राहून काही लोक या गावात परतले असून इथे व्यवसाय करून भरपूर पैसे त्यांनी कमावले आहेत. कबुतराची शिकार करण्यासाठी धावलं मांजर...पण...पुढे जे घडलं ते बघून वाटेल आश्चर्य; बघा मीडिया रिपोर्ट्सनुसार, या गावातील सुमारे 65 टक्के लोक एनआरआय आहेत. 1968 मध्ये लंडनमध्ये माधापर व्हिलेज असोसिएशनची स्थापना झाली, या माहितीवरून इथले लोक किती मोठ्या प्रमाणात परदेशात जातात याचा अंदाज येतो. या असोसिएशनची स्थापना तिथे यामुळे झाली कारण त्याठिकाणी मोठ्या संख्येने या गावातील लोक राहत होते. या सर्वांना एकमेकांशी जोडून ठेवण्यासाठी ही संघटनाही स्थापन करण्यात आली. आजही या गावातील लोक मोठ्या संख्येने परदेशात राहतात आणि हे लोक आपल्या कुटुंबियांना मोठी रक्कम पाठवतात. यामुळेच येथील प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 15 लाखांहून अधिक रुपये आहेत.
1 Comments
भाईंयो पि. एम्. जी ने अपनी प्रदेश के एक गाव के हर एक के खाते में १५ लाख रुपये जमा है।
ReplyDelete