पंढरपूर सिंहगडच्या मेकॅनिकल विभागात स्पीच अँड रिझुम रायटिंग स्पर्धा संपन्न



 *पंढरपूर सिंहगडच्या मेकॅनिकल विभागात स्पीच अँड रिझुम रायटिंग स्पर्धा संपन्न*

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाने विद्यार्थ्यांसाठी स्पीच अँड रिझुम रायटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयातील १३० हुन अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. 

  या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. कैलाश करांडे, डॉ.स्वानंद कुलकर्णी, डॉ. समिर कटेकर, डॉ. शाम कुलकर्णी, प्रा. अभिजीत सवासे, प्रा. हृषिकेश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.



   या दरम्यान मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख 

डॉ. शाम कुलकर्णी यांनी स्पर्धेचा उद्देश व त्याचे महत्व सांगितले,

डॉ. समिर कटेकर व प्रा.अभिजीत सवासे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पीच अँड रिझुम रायटिंग स्पर्धेचे मार्गदर्शन केले

  करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असल्याची माहिती सहभाग झालेल्या विद्यार्थ्यांना दिली. स्पीच कॉम्पिटीशन मध्ये मुनिरा खान यांनी प्रथम क्रमांक तर सायरा शेख द्वितीय क्रमांक पटकाविला असुन

 रिझुम रायटिंग कॉम्पिटीशन मध्ये कोमल माळी उपविजेती व उमा गायकवाड आणि प्रियांका चांडोले यांना विजेतेपद विभागून देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रेयसी काळेल व रुपाली चौधरी यांनी केले तर ओंकारेश्वर अडवळकर यांनी आभार मानले.

 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील मेसा असोसिएशन यांच्यासह मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, प्रा. हृषिकेश देशपांडे सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments