Breaking : महाविकास आघाडीत बिघाडी ? काँग्रेसचा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा

 


मुंबई : ओबीसी समाजाच्या आरक्षणावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. मविआ सरकारचा घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना इशारा दिला आहे.

ओबीसींच्या प्रश्न सोडवा. काँग्रेसच्या ओबीसी विभागाला आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका. ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. ओबीसी समाजाला न्याय द्यावा, अन्यथा प्रदेश काँग्रेस कमिटीचा ओबीसी विभाग (obc) राज्यभर आंदोलन करेल, अशा आशयाचं पत्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. राज्यात सत्तेत असूनही काँग्रेसने आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, ओबीसी समाजाच्या समस्यांवरुन कॉंग्रेसचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी विभागाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पत्रातद्वारे दिले आहे. ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. ओबीसी समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी ठाकरे यांच्याकडे केली आहे. ओबीसींना न्याय दिला नाही, तर प्रदेश काँग्रेस कमिटीचा ओबीसी विभाग (obc) राज्यभर आंदोलन करेल, असा इशाराही पटोले यांनी दिला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारिणीची उद्या मुंबईत बैठक होणार आहे. राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका,आमदारांचे निधीचे प्रश्न, महामंडळ नियुक्त्या विविध प्रश्नांवर खलबतं होणार आहेत. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे.



Post a Comment

0 Comments