मॅजिक बॉल गिळल्याने नाशकातील दीड वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच येवल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
मधाचे मोहोळ काढण्याचा मोह एका 12 वर्षीय बालकाच्या जीवावर बेतल्याने त्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. येवल्याच्या येवल्याच्या सुरेगाव येथे ही घटना घडली.
ऋषिकेश चव्हान, असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसर सुन्न झाला आहे.
मधाचा मोहोळ काढणे एका 12 वर्षीय बालकाच्या जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना येवल्याच्या सुरेगाव येथे घडली. शेतात असलेले मोहोळ काढण्यासाठी ऋषिकेश चव्हान गेला होता.
मात्र, त्याच्यामागे मधमाशा लागल्यामुळे तो पळत जात असताना विहिरीत पडला आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
बराच वेळ होऊन देखील ऋषिकेश घरी न आल्यामुळे त्याचा शोध घेण्यात आला असता विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला.
0 Comments