आमखोल गावची जाग्रृत आई काळेश्वरी माता


शिमगा अर्थात होळी,शिमगा  आणि कोकणातील लोकांचे या सणाशी  एक वेगळेच नाते जोडले गेले आहे  नाही का,,,,गौरी गणपतीच्या सणानंतर एक महत्त्वाचा सण म्हणुन ग्रामिण भागात  वैशिष्टय पुर्ण मानले जाते   तितक्याच श्रद्धा भक्तिने या सणाची वाट प्रत्येक जण पहात असतो मग कामासाठी मुंबईत चाकरी करणारे चाकरमानी का असेनात ,या सणाला मात्र सुट्टी मिळो  वा न  मिळो त्या कामावर वेळेप्रसंगी  दांडी मारुन त्या सणाला आमचा कोकणातील माणुस हमखास हजेरी लावणारच,कारण त्याची श्रद्धा विश्वास त्या ग्रामदेवतेवर तितकीच त्याच्या रोमारोमात भिनलेली असते  असो,त्याच श्रद्धेने तो देवतेच्या चरणी नतमस्तक होतो व संकट विघ्न दूर करण्याचे देवतेला साकडे घालतो 


        कोकणातील शिमगा सणाला प्रत्येक गावाला एक परंपरा लाभलेली आहे त्यानुसार हा होळीचा सण वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या गावात साजरा केला जातो 

        खेळी:-खेळी याचा साध्या सरळ शब्दात सांगायचे झाल्यास ग्रामदेवतेचा "भक्त "जो पालखी सोबत असतोच परंतु ग्रामदेवतेची  पालखी अनवानी खांद्यावर घेवुन कसलीही तमा न बाळगता भक्तित दंग होवुन देवाला नाचवतो त्यास ग्रामिण भागात श्रद्धेने "खेळी" असे संबोधले जाते 


         चला तर मग बांधवहो, आपण आमखोल गावच्या परंपरेविषयी थोडक्यात शिमग्याची  आपण अल्प महती जाणुन घेऊयात ,

         रत्नागिरी जिल्हयातील दापोली तालुक्यातील डोंगर रांगांच्या वनराईने नटलेल सुंदर असे "आमखोल"गाव ,या गावची जागृत अशी देवी  आई काळेश्वरी मातेचे मंदिर वसलेल आहे देवीच्या पालखीत काळेश्वरी माते सोबत मावळेभाचे,शेंदकरीण माता,यांनाही आदराणे बसवले जाते ,व मनसणारे पाटिल यांच्या मार्फत देवीला जे देवीचे भक्त असतात त्यांना सुखशांतीचे  भरभराटीचे दिन येवो असे साकडे  देवीला घातले जाते 

           मुळातच दहा दिवस चालणारा शिमग्याचा सण परंपरेनुसार गावात दहा दिवस होळीचे दहन केले जाते  पुर्वी दुसर्या किवा तिसर्या होळीच्या दिनानंतर पालखी देवीची भक्तांच्या भेटीला  गावाबाहेर नेली  जायची,परंतु सध्याच्या काळात खेळ्यांची जाणवणारी कमतरता,कामानिमित्त मुंबईला स्थिरावलेले चाकरमानी बांधव या सगळ्या कारणांमुळे पालखी दोन तीन दिवसांकरताच गावा बाहेर नेली जाते यावेळी पालखीला विदयुत रोषनाईने आणि फुलांच्या हारांनी सजवुन पारंपारीक वाद्य सनई ढोल टिमकी सोबतच  ताशांच्या गजरात घंटानाद करत त्या पालखीची मिरवणुक काढत गावाबाहेर नेली जाते तहान भुख विसरुन  यावेळी अबालवृद्ध या मिरवणुकीत सहभागी होतात हाती भगवे निशाण घेवुन ते डौलाने फडकावत भक्तिभावाने भक्त तल्लीन होताना दिसतात ,यावेळी एकही भक्त पायात पादत्राण घालत नाही हे विशेष,पायाला दगड लागु दे,किवा ऊन्हाने पाय पोळले तरी,त्याची किंचीतही वेदना त्या भक्ताला जाणवत नाही कारण त्या देवीच्या  भक्तीची सेवेची गोडी व ओढ त्याला लागलेली असते

           अशा तर्हेने पालखी आजुबाजुच्या गावातुन फिरवुन आणल्यानंतर वाजत गाजत पुन्हा आपल्या पालख्यांच्या गाठीभेटी  झाल्यावर ,काही ठिकाणी "शेराण"अर्थात आपल्या देवीची खुणगाठ लपवुन ठेवली जाते ती खुणा देवी  भक्तांकरवी शोधुन काढुन दाखवते त्यास शेराण म्हटले जाते हि जुनी  परंपरा आजही देवीची जपली जाते हे शेराण पाहण्यासाठी भक्तजण मोठ्या भक्तिभावाने पाहण्यासाठी गर्दि करतात अशा तर्हेने पालखी पुन्हा गावात आणली जाते  

            श्रद्धेने पालखी आमखोल गावचे ग्रामस्थ भक्त भाविक यांच्या प्रत्येक घरात देवतेला श्रद्धेने नेली जाते तिथे तिची पुजा अर्चा केल्यावर पाटलांकरवी देवीला साकडे घालुन सदा कृपा छाया ठेवण्याची याचना केली जाते नवस केला व फेडलाही जातो  यथाशक्ति खेळ्यांना मान व श्रद्धेने त्यांनाही भंडारा प्रसाद दिला जातो गावात प्रत्येक घरात पालखीला फिरवुन झाल्यावर पालखीला समाज मंदिरात बसवली जाते आणि शेवटचा मोठा होम अर्थात होळी पेटवली जाते यावेळी त्या होमासाठी लाकडे सुकापेंडा,गोळा करण्याची मजा व आनंद हा फक्त ग्रामिण भागातच अनुभवता येतो  नाही का,,,,,,,,

        मोठा होम ऊभा केल्यानंतर    त्या होमाभोवती गोल फेरा घेत गावकरी शिमग्याचे  फाग म्हणतात व होळीला हे दिवस आनंदाचे पुन्हा दाखवण्याचे विनंती करत होळी पेटवली जाते  व होळी भवती देवीच्या पालखीलाही होळी भोवती गोल फिरवत नाचवत बोंब मारली जाते  अशा तर्हेने दिवस उजाडतो तो म्हणजे "धुळीवंदनाचा"यावेळी गुलाल उधळत रंगपंचमी खेळली जाते रंगात भिजुन जिवनात ही रंग यावा आपापसात एकात्मता,वाढीस लागावी याचा संदेश धुळवड अर्थात रंगपंचमीतुन मिळतो आणि पालखी देवळात नेवुन देवीला मुळ जागेत स्थानापंन्न होण्याचे आवाहन करुन गावकर्यांना सुख समृद्धीचे साकडे घातले जाते ,यावेळी गुळ खोबर्याचा प्रसाद सर्वाना वाटुन  ग्रामदेवता माऊली ,आई काळेश्वरी मातेला वंदन करुन या सोहळ्याची सांगता केली जाते 


       बांधवहो,आजच्या विज्ञानवादी,तंत्रज्ञानाच्या युगात  कोकणातील आपल्या भोळ्या भाबडया बांधवानी ही परंपरा  संस्कृती जपली आहे व काळाच्या ओघात बदलत चाललेल निसर्ग   परिवर्तन अशा द्विधा स्थितीत येणार्या काळातही पुढच्या नव पिढिनेही हि परंपरा कायम जपावी व पुढे नेण्यास आपलेही योगदान द्यावे हि शुद्ध भावना यामागे दडलेली आहे ,आणि या साहित्य प्रपंचातुन आई काळेश्वरी मातेला मनोभावे वंदन

        आई तुझ्या मंदिराला

       शोभतो दगडाचा पाट

       वाहे त्यात पाण्याचा झरा

        मन मोहि त्याचा थाट ,,,,,,,


        पालखी तुझी  सजली

        हार फुले  रंग रंगानी

       खेळी दंग झाले नामात

         सदा  मांगल्य नांदावे हिच मागणी,,,,,,



श्री सनी गणेश आडेकर मुंबई

Post a Comment

1 Comments