चित्रपट दिग्दर्शक-निर्माता
राम गोपाल वर्मांवर अभिनेत्री श्रीदेवी भडकली आहे. वर्मा यांनी आपल्या
आगामी चित्रपटाचे नाव 'श्रीदेवी' ठेवल्याने श्रीदेवीने त्यांना कायदेशीर
नोटीस बजावलीय. वर्मा यांनी आपल्या चित्रपटाचे नाव सुरूवातीला 'सावित्री'
असं ठेवलं होतं. पण नंतर त्यांनी हे नाव बदलून 'श्रीदेवी' केलं. यामुळे हा
वाद निर्माण झाला आहे.
'वर्मा यांनी चित्रपटाला नाव देण्यापूर्वी आपली सहमती घेतलेली नाही. तसंच हा प्रकार खासगी जीवनात हस्तक्षेप करणारा आहे. यामुळे आपल्याला प्रचंड मनस्ताप झाला असून चित्रपटाच्या कथानकाची माहितीही दिलेली नाही', अशी नोटीस श्रीदेवीने वर्मांना बजावलीय. श्रीदेवीच्या वकीलांनी ही माहिती दिली.

1 Comments