मुलांबरोबरचा पहिला सीन जो संध्याकाळी ६ ला सुरु झाला तो रात्री १० वाजता
संपला . मुले ब-याच सूचना करायची आणि गंमत म्हणजे मोकाशी सर त्या सर्व
सूचना शांतपणे ऐकून घ्यायचे . श्रीरंगने या पूर्वी चिंटू , मसाला असे ४ ते ५
चित्रपट केलेले असल्याने तो बिनधास्त असणे स्वाभाविक होते मात्र पुष्कर
ज्याचा हा पहिलाच सिनेमा होता तो श्रीरंग पेक्षा बिनधास्त वाटत होता .
दोघेही काही वेळा उत्स्फूर्त संवाद म्हणायचे , एक दोन
वेळा त्यांनी मनाची काही वाक्ये टाकली माझ्या सुदैवाने मलाही लगेच
प्रत्युत्तर देता आल्याने सीन रंगले . मुलांचा उत्साह बघून सेटवर सगळेच
आनंदात होते. मुलाच्या दिमतीला एकजण सतत तयार ठेवलेला होता . त्याच्या
जवळच्या पिशवीत क्याडबरी , फ्रुटी , आइसक्रीम असे पदार्थ असायचे . मुले
नाराज किंवा थकल्या सारखी वाटली कि लगेच त्यांना खिलाव पिलाव सुरु व्हायचं
. त्यामुळे मुले सतत खुश असायची... .क्यामेरामन अमोल गोळे हे प्रचंड उत्साहाने २ च्या जागी ४ टेक घ्यायचे . पूर्ण समाधान झाल्या शिवाय कुणीच सीन ओ के करत न्हवते. स्वतः मोकाशी सर सर्वांची मते विचारून घेऊनच पुढच्या सीन कढे वळायचे त्यामुळे वेळ लागला तरी चांगले ते दिल्याचे समाधान असायचे , स्टयांडचा फार कमी वापर गोळेनी क्यामे-या साठी केलेला मी बघितला . बहुतेक वेळा ते क्यामेरा खांद्यावर किंवा हातात पेलतच सीन शूट करायचे . क्यामे-याचे ओझे काही कमी न्हवते . क्यामेरा हातातून निसटू नये म्हणून एक हुक त्यांच्या डोक्यावरून पुढे
आलेला क्यामे-याला अडकवलेला असायचा . या सर्वामुळे क्यामेरामन अमोल गोळे एखाद्या परग्रहावरच्या यंत्र मानवासारखे दिसायचे . विशेष म्हणजे समाधान होई पर्यंत ते सीन ओ के करत न्हवते . वेगवेगळ्या एन्गल ने तो सीन कसा दिसेल याचा विचार ते सतत करत असायचे आणि एखादा सीन त्यांच्या मनासारखा वाटला नाही तर मोकाशी सरांना तसे ते स्पष्ट सांगायचे. ..त्यावर मग पुन्हा चर्चा व्हायची आणि परत तो सीन चित्रित व्हायचा .
माझ्या एका सीन दिवशी नेमके तुळशीचे लग्न होते . माझ्याबरोबरचे एक सहकारी लग्न लाऊन येतो म्हणून गेले ते बराच वेळ . दरम्यान माझे क्लोज आणि मुलांबरोबरचे संवाद घेण्यात आले .पण मला हलता येत नसल्याने मी वाड्यातल्या भाडेकरूंना तुळशी विवाह उरकून घ्यायला सांगितला . एन वारीत चित्रीकरण केल्याने यात्रेकरूंच्या गर्दीचा शूटला बराच अडथळा व्हायचा मात्र त्या सगळ्यावर मत करत चित्रीकरण व्यवस्थित सुरु राहिले ... माझ्या ५ ते ६ सीन साठी मला आठवडाभर सेट वर जावे लागले. ..शेवटचा सीन रात्री २ वाजता संपला आणि एक मोठी पोकळी निर्माण झाल्या सारखे वाटले.
श्याम सावजी ...पंढरपूर
------------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------
पंढरपूरचे पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी महाराष्ट्राच्या कानाकोर्यातून विविध भागातील ताज्या बातम्या पाठविणेसाठी
प्रतिनिधी नेमणे आहेत...
या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...
आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी विविध उद्योजक, व्यापारी व संस्था आता आपल्या जाहिराती पंढरपूर लाईव्हसाठी देवू शकतात...
-
तसेच वाढदिवस वगैरे शुभेच्छा जाहिराती व विविध समारंभाच्या आमंत्रणाच्या जाहिराती सुध्दा आपण पंढरपूर लाईव्ह वर देवू शकता...
आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी
संपर्क साधावा...


1 Comments
www.marathijokes.in
ReplyDeleteGet all new marathi jokes in marathi font here