मंदिर परिसरातील वाहतुक व्यवस्थेचा बोजवारा...! प्रदक्षिणा मार्गावर दररोज होतेय वाहतुकीची कोंडी..! नो पार्किंग झोनवर बिनदिक्कत पार्क असतात वाहने..!

पंढरपूर Live 15 एप्रिल
पंढरपूर मधील श्रीविठ्ठल रुक्मिणी  मंदिर परिसरात व प्रदक्षिणा मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली असते. या भागात वाहतुक पोलिसांच्या दुर्लक्षीतपणामुळे वाहतुक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आढळून येत आहे.


प्रदक्षिणा मार्गावरील चौफाळा, नाथ चौक, पद्मशाली धर्मशाळा, महाद्वार पोलिस चौकी, दर्शन बारी सेतु, कालिका देवी चौक, काळा मारुती चौक, इंदिरा गांधी भाजी मार्केट आदी ठिकाणी दररोज मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. महाद्वार पोलिस चौकी लगतच दर्शनबारी सेतु नजीक चक्क ‘नो पार्किंग’ च्या बोर्डाखालीच बिनदिक्कतपणे चार चाकी वाहने पार्क होत असतात. येथील व्यापार्‍यांचे व वाहन पार्क करणारांचे यामुळे दररोज छोटे मोठे खटके उडत असतात.

‘‘दुकानांसमोर नो पार्किंग झोन असूनही येथे वाहने पार्क झाल्यास याबाबत जाब विचारला तर संबंधीत वाहनधारक हुज्जत घालतात. अरेरावीवर उतरतात, अशा वेळी आम्ही व्यवसाय करायचा की भांडत बसायचे?’’ असा सवाल करुन  पंढरपूर शहर वाहतुक शाखेचे कर्तव्यदक्ष वाहतुक पोलिस उपनिरीक्षक निलेश गोपाळचावडीकर यांनी स्वत: या भागातून दररोज किमान एक तरी चक्कर मारावी व स्वत: येथील बेशिस्त वाहतुकीचा अनुभव घ्यावा. असे मत येथील अनेक व्यापार्‍यांनी पंढरपूर लाईव्ह शी बोलताना व्यक्त केले. 

Post a Comment

1 Comments

  1. आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट, प्रदक्षिणा मार्गातील सर्व अतिक्रमणाचा विचार होणार आहे का?

    ReplyDelete